मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 18 मे 2022 (19:38 IST)

लिंबापाठोपाठ टोमॅटो महागले

tomato
देशात लिंबूनंतर आता टोमॅटोवरही महागाईचा रंग चढू लागला आहे. उष्ण हवामानामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले असून, त्यामुळे त्याच्या भावात मोठी वाढ होत आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये जिथे टोमॅटोचा किरकोळ भाव 90 रुपये किलोवर पोहोचला आहे, तिथे उत्तर भारतातील राज्यांमध्ये हा भाव 50 ते 60 रुपये किलोवर आहे. भाजीपाला व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर भारतातील राज्यांमध्ये पुढील महिन्यापर्यंत हा भाव 80 ते 100 रुपये किलोपर्यंत जाऊ शकतो.
 
या शहरांमध्ये किंमती सातत्याने वाढत आहेत
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीवर नजर टाकली तर असे समोर आले आहे की, सध्या देशभरातील किरकोळ बाजारात टोमॅटो 40 ते 84 रुपये किलोने विकला जात आहे, तर दोन आठवड्यांपूर्वी 30 ते 60 रुपये प्रतिकिलो भाव होता. आजकाल देशातील सर्वात महाग टोमॅटो दक्षिण आणि पूर्व भारतातील शहरांमध्ये विकला जात आहे. कर्नाटकातील शिमोगा येथे टोमॅटो 84 रुपये किलोने विकला जात आहे. आंध्र प्रदेशातील कुरनूलमध्ये 79 रुपये आणि ओडिशातील कटकमध्ये 75 रुपये दराने विक्री होत आहे. टोमॅटोचा किरकोळ भाव दिल्लीत 40 ते 50 रुपये, भोपाळमध्ये 30 ते 40 रुपये, लखनऊमध्ये 40 ते 50 रुपये आहे. मुंबईत तो 60 ते 70 रुपये किलोने विकला जात आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीत 20 ते 30 रुपये, भोपाळमध्ये 20 रुपये आणि मुंबईत 36 रुपये असा भाव होता.