रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (14:30 IST)

KTM 390 Adventure स्पोर्ट्स बाईक लाँच, जाणून घ्या प्रमुख बदल

KTM स्पोर्ट्स बाइक्सना भारतीय बाजारपेठेत खूप पसंती दिली जाते, तर कंपनी आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी वेळोवेळी काही नवीन वैशिष्ट्ये देखील जोडत असते. ही स्पोर्ट्स बाईक तिच्या शानदार लूकसाठी ओळखली जाते, जी तरुणाईला खूप आवडते. आपल्या ग्राहकांना आणखी चांगला राइडिंग अनुभव देण्यासाठी, KTM ने जागतिक स्तरावर 2022 KTM 390 Adventure सादर केली आहे. नवीन अपडेटेड बाइकमध्ये जास्त बदल होणार नाहीत, प्रामुख्याने कॉस्मेटिक आणि इलेक्ट्रॉनिक्स बदल केले गेले आहे.
 
यापूर्वी, KTM ने भारतीय बाजारात नवीन RC 200 आणि RC 125 लाँच केले होते. आता असा अंदाज लावला जात आहे की कंपनी 2022 च्या सुरुवातीला RC390 लाँच करू शकते.
 
KTM 390 Adventure Makeover
तसे, KTM 2022 मध्ये फारसा बदल झालेला नाही. पण अपडेटेड बाईकमध्ये काही इलेक्ट्रॉनिक आणि कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. यासह, KTM 390 Adventure मध्ये 2 इतर रंग पर्याय जोडले गेले आहेत, जे ग्राहकांना त्यांच्या आवडत्या रंगाचा पर्याय निवडण्याची संधी देईल.
 
नवीन इलेक्ट्रॉनिक बदलांनुसार, KTM 390 Adventure ला दोन भिन्न मोड - स्ट्रीट आणि ऑफ-रोड मोडमध्ये स्विच करण्यासाठी एक कंट्रोल पॅनल मिळेल, ज्यामुळे रायडर्स ड्रायव्हिंग करताना त्यांच्या राइडचा मोड निवडू शकतात.
 
व्हील्समध्ये बदल
केटीएमच्या या एडवेंचर बाईकचे अलॉय व्हील देखील अपडेट करण्यात आले आहेत. जिथे ते आता 12-स्पोक ऐवजी 10-स्पोकसह ऑफर केले जाईल. कंपनीच्या म्हणण्यानुसार, रिम्स कडक ठेवण्यात आले आहेत जेणेकरुन रायडर्स बाईक सहजपणे हाताळू शकतील आणि ऑफ-रोडवर बाइक घेतल्यास कोणतीही काळजी न करता त्यांच्या राइडचा आनंद घेऊ शकतील.
 
न्यू कलर ऑप्शन
केटीएम 390 एडवेंचरमध्ये दोन आणखी कलर ऑप्शन जोडण्यात आले आहे, ज्यात ऑरेंज ब्लॅक, ब्लू ऑरेंज सामील आहे.
 
इंजिन आणि गियरबॉक्स
केटीएमच्या इंजिनमध्ये कुठलाही बदल केले गेला नाहीये. यापूर्वी यात 373 CC, सिंगल-सिलेंडर इंजिन येत होतं, जे 43.5 PS च्या मॅक्सिमम पॉवर आणि 37 एनएमच्या पीक टॉर्क जेनरेट करण्यात सक्षम आहे. इंजिनला क्विक शिफ्टरसह 6-स्पीड गियरबॉक्स याशी जोडण्यात आले आहे.