लासलगाव बाजार समिती २ एप्रिल पर्यंत बंद
आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजार पेठे असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती मधील कांदा आणि धान्य लिलाव हे ९ दिवस बंद राहणार आहे.आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे आणि सलग आलेल्या सुट्या आल्याने बाजार समिती मधील कांदा आणि धान्य लिलाव हे ९ दिवस बंद राहणार आहे. शनिवार , रविवार,सोमवारी आलेली अमावस्या, मंगळवारी आलेला पाडवा आणि मार्च एन्ड मुळे लासलगाव बाजार समितीचे लिलाव हे २ एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याचे माहिती बाजार समिती कडून देण्यात आलेली आहे.या सलग आलेल्या सुट्यामुळे बाजार समिती चे कोट्यवधीचे व्यवहार ठप्प पडणार आहे.