गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

‘लिंक्ड इन’कडून प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर

‘लिंक्ड इन’ या प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईटने 2017 मधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्यासह दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत अशा 50 जणांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांना आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत नाव कमावलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लिंक्ड इनच्या प्लॅटफॉर्मवर 22 लाख फॉलोअर्स असून, त्यांचं तिसऱ्यांदा या यादीत नाव आले आहे. नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी, काँग्रेस नेते शशी थरुर, ‘सिप्ला’चे प्रबीर झा, शाओमी टेक्नोलॉजीचे उपाध्यक्ष मनु कुमार जैन यांचाही समावेश या 50 जणांच्या यादीत करण्यात आला आहे.