शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (18:42 IST)

घरगुती सिलिंडर महागले

LPG Gas Cylinder
सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस (14.2 किलो) सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. आता घरगुती सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. आता घरगुती सिलिंडरची किंमत 999.50 रुपये प्रति सिलिंडर असेल.  याआधी मार्च 2022 मध्ये घरगुती सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.   
 
 या महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्यांनी एलपीजी गॅसच्या दरात 102.50 रुपयांची वाढ केली होती.  19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. किमतीत वाढ झाल्यानंतर या निळ्या सिलेंडरची नवी किंमत आता दिल्लीत 2355.50 रुपये झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत 2253 रुपये होती.  
 
 त्याच वेळी, 5 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत सध्या 655 रुपये आहे. महिनाभरापूर्वी 1 एप्रिल रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 250 रुपयांनी वाढ करण्यात आली  होती. यापूर्वी 1 मार्च रोजी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 105 रुपयांनी, तर 22 मार्चला 9 रुपयांनी वाढ करण्यात आली होती.