1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 1 जुलै 2023 (10:26 IST)

LPG Price July 2023: एलपीजी सिलिंडरचे नवीन दर जाहीर, दिलासा किंवा महागाईचा वाढलेला भार जाणून घ्या

gas cylinder
LPG Price July 2023: सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किमतींचे पुनरावलोकन करतात. 1 जुलैच्या आढाव्यानंतर एलपीजीचे नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, या महिन्यात घरगुती आणि व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
LPG Cylinder Price on 1st July 2023
नवी दिल्ली : घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपये, तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1773 रुपये राहील.
मुंबई: 14.2 किलोग्रॅमचा सिलेंडर 1102.50 रुपयांना, तर 19 किलोग्रॅमचा व्यावसायिक सिलिंडर 1725 रुपयांना मिळणार आहे.
कोलकाता : घरगुती सिलेंडरची किंमत 1129 रुपयांवर स्थिर आहे, तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1875.50 रुपयांवर कायम आहे.
चेन्नई: घरगुती सिलिंडर 1118.50 रुपयांना विकला जात आहे, तर व्यावसायिक 1937 रुपयांना विकला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत चढ-उतार झाला आहे. त्याचबरोबर घरगुती सिलिंडरच्या किमतीतही थोडा बदल करण्यात आला आहे. 19 किलोच्या सिलिंडरचा विचार केला तर जूनमध्ये त्याची किंमत 83 रुपयांनी कमी झाली होती.