गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 20 ऑक्टोबर 2022 (23:06 IST)

Mahindraची सर्वात स्वस्त Electric Car Atom,100 किलोमीटरच्या रेंजचा दावा

mahindra
महिंद्राने दोन वर्षांपूर्वी ऑटो एक्सपो 2022 मध्ये आपल्या अॅटम इलेक्ट्रिकची झलक दाखवली होती. ते 2020 मध्येच लाँच होणार होते. कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे त्याचे लॉन्चिंग पुढे ढकलण्यात आले. आता कारबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत. लोक या स्वस्त इलेक्ट्रिक कारची वाट पाहत आहेत. असा दावा केला जात आहे की ही छोटी इलेक्ट्रिक कार मारुतीच्या अल्टोपेक्षा स्वस्त असेल आणि 100 किलोमीटरपर्यंतची रेंज देईल. कारची किंमत 3 ते 5 लाखांच्या दरम्यान असेल असे सांगितले जात आहे. इलेक्ट्रिक वाहन विभागातील ही सर्वात स्वस्त कार असेल, असे मानले जात आहे.
 
4 वॅरिएंटमध्ये येईल: अलीकडेच लीक झालेल्या RTO दस्तऐवजात, या मिनी EV बद्दल काही मोठी माहिती समोर आली आहे. ती 4-डोरची मिनी कार म्हणून येईल.
 
त्यात फक्त 4 लोक बसू शकतात.  Mahindra Atomची रचना क्वाड्रिसायकल म्हणून करण्यात आली आहे. बातमीनुसार, ही कार K1, K2, K3 आणि K4 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली जाईल.
 
बातम्यांनुसार, K1 आणि K2 व्हेरिएंटमध्ये 7.4 kWh, 144 Ah बॅटरी पॅक मिळेल तर Atom K3 आणि K4 मध्ये 11.1 kWh, 216 Ah बॅटरी पॅक मिळेल. 

Edited by : Smita Joshi