बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीवरून केली सरकारवर टीका

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त लिहिलेल्या एका लेखात सरकारवर जोरदार टीका केली आहे. नोटाबंदीची कल्पना मूळातच चुकीची होती असे सांगताना माजी पंतप्रधानांनी सरकारच्या आर्थिक धोरणावर कठोर शब्दात ताशेरे ओढले आहेत.
 
नोटाबंदीला वर्षपूर्ती होत असताना अर्थव्यवस्थेला बसलेला झटका सर्वांना अनुभवायला मिळत आहेच, देशातल्या संस्थात्मक रचनेला बसलेल्या धक्क्याची चिंता आहे असं मनमोहन सिंग यांनी लेखात म्हंटले आहे. आज दुपारी नोटाबंदीच्या निर्णयाविषयी डॉ. मनमोहन सिंग पत्रकार परिषद घेऊन आपले मत मांडणार आहेत.