1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2019 (15:14 IST)

एमजी हेक्टरवरून 15 मे रोजी दूर होईल संपेंस

एमजी हेक्टर फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. कंपनी त्याच्या प्रोडक्शन मॉडेलला 15 मे 2019 रोजी जगा समोर सादर करणार असून कंपनीने त्याला जूनमध्ये भारतात लॉन्च करण्याची योजना आखली आहे. भारतात, या कारची किंमत 15 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत असू शकते. त्याची टक्कर जीप कम्पास, टाटा हॅरियर, हुंडई टक्सन आणि महिंद्रा एक्सयूव्ही 500 सह होईल.
 
ब्रिटीश कंपनी मॉरिस गॅरेज (एमजी)ची भारतात ही पहिली गाडी आहे. कंपनीने एमजी हेक्टरबद्दल काही माहिती आधीच शेअर केली आहे. यात फिएटचे 2.0-लिटर मल्टीझेट डीझल इंजिन उपलब्ध होईल. हे इंजिन जीप कम्पासमध्ये देखील लागलं आहे. पेट्रोल मॉडेलमध्ये 1.5 लिटर टर्बोचार्ज्ड इंजिन, 48 वॉट मायल्ड-हायब्रिड टेक्नोलॉजीसह येणार. या प्रकरणात ही सेगमेंटची पहिली कार असेल.
 
हेक्टर एसयूव्हीच्या पॉवर आउटपुट आणि हेक्टर ट्रांसमिशन संबंधित माहिती सध्या उपलब्ध नाही आहे. एमजी हेक्टरमध्ये 10.4-इंची वर्टिकल ओरिएंटेड टचस्क्रीन इन्फोटेशन सिस्टम मिळेल. सेगमेंट फर्स्ट फीचर म्हणून यात ईसिम टेक्नॉलॉजीसह अनेक फीचर्स मिळतील. एमजी हेक्टर ऑल-ब्लॅक आणि ड्यूल-टोन इंटियर थीमसह सादर करण्यात येईल. सनरूफ आणि 360 डिग्री पार्किंग कॅमेरा यासह अनेक कामाचे फीचर्स यात मिळणार आहे.