शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (16:49 IST)

स्पायकरने लाँच केल्या अॅथलिझर डेनिम्स - ‘जिमजिन्स’

स्पायकर या भारतातील अग्रगण्य फॅशन डेनिम ब्रॅण्डने अॅथलीझर डेनिम्सची एक नवीन श्रेणी - ‘जिमजिन्स’ बाजारात आणली आहे. हाडेनिम्सचा पुढील टप्पा आहे, कारण, यामध्ये ‘फोर - वे डायनॅमिक स्ट्रेच’ आणि ‘एर्गोनॉमिक बनावट’ ही वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच या वर्क-आउट्ससाठी घालता येतील अशा पहिल्या डेनिम्स आहेत. आताच्या युवा पिढीच्या वेगवान आयुष्याशी सुसंगत अशा मस्त, टिकाऊ आणि वैविध्य पूर्ण कपड्यांची मागणी लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. ही डेनिम जिम मध्ये तसेच बाहेर ही वापरण्यासाठी उत्तम आहे! ही डेनिम्स हालचालींचे अमर्याद स्वातंत्र्य देते. त्याचप्रमाणे अत्यंत स्टायलिश फिटनेस प्रेमींसाठी स्पायकर जिम-जिन्स डिझाइन करण्यात आल्या आहेत. स्त्री व पुरुषांसाठी १८ शैलींत उपलब्ध असलेल्या या डेनिम्स एका दिवसात वर्क-आउट्ससह अनेक गोष्टी करणाऱ्यांसाठी आदर्श पेहराव ठरेल. स्पायकर जिम-जिन्स ची पेअर अत्यंत आरामदायी व ताणली जाण्याजोगी असून त्यामुळे तिचे फिटिंग उत्तम आहे. तसेच तिचे स्टायलिंग मजबूत आहे. उत्पादनाच्या वैशिष्ट्यांशी सुसंगत अशी टॅगलाइन #बिक्सट्रा या अभियानासाठी देण्यात आली असून, ती ग्राहकांच्या लक्ष्य समूहाला अर्थात आजच्या युवा पिढीला आवश्यक तो संदेश पोहोचवणारी आहे.
 
स्पायकर लाइफस्टाइलचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय वखारिया म्हणाले, “मिलेनिअल्स वेळेबाबत सजग, महत्त्वाकांक्षी आणि सतत कुठेतरी जाण्याच्या तयारीत असतात. ते जे काही करत असतात, त्याबद्दल सांगायला त्यांना आवडते आणि ते जे काही वापरतात त्यात वैविध्य व उपयुक्तता त्यांना हवी असते. स्पायकर जिम जिन्समुळे त्यांना व्यायाम ते मौजमजा ते मनोरंजन असे सगळे काही करता येईल.