बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : बुधवार, 10 एप्रिल 2019 (15:34 IST)

समर वेडिंग फॅशन फॉर नवरदेव ...

दोस्तांनो, सध्या लाग्नाचा हॉट सीझन आहे. लग्नातले पेहराव म्हटले की मुलींसाठी भरपूर ऑप्शन्स असतात. पण नवर्‍या मुलाचं काय? त्याने कुर्ता पायजमा, शेरवानीपर्यंत मर्यादित का राहावं? उन्हाळ्यात लग्न असेल तर आरामदायी, सुटसुटीत तरीही ट्रेंडी कपड्यांचा ऑप्शन आहेच की! अशाच काही हटके पर्यायांबद्दल.... 
 
* दोस्तांनो, नवरदेवासाठी खास लेहंगे आणि अनारकली डिझाईन करण्यात  आले आहेत. असे पेहराव ही नवर्‍या मुलींची मक्तेदारी राहिलेली नाही. असे हटके पेहराव वेगवेगळ्या फॅशन शोजमधून समोर येत आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सच्या सुपीक डोक्यातून अशा हटके पेहरावांची संकल्पना येत आहे. तुम्हीही असं काही तरी ट्राय करू शकता. 
 
* नवरदेवासाठी धोती हा आरामदायी असा ऑप्शन ठरू शकतो. लग्नविधिंमध्ये पारंपरिक कपड्यांना प्राधान्य दिलं जातं. अशा वेळी तुम्ही ही धोती कॅरी करू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये धोतीचं रुपच पालटून गेलयं. 
 
* जोधपुरी पँट्स किंवा जोधपुरी धोती हा प्रकार ट्राय करायला हरकत नाही. हा प्रकार स्टायलिश दिसतो. वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये या पँट्स उपलब्ध आहेत. 
 
* नेहरू जॅकेट किंवा मोदी जॅकेटचा ट्रेंड अजूनही आहे. भारतीय परांपरिक पोशाखावर जॅकेटची ही स्टाईल खुलून दिसते. यामुळे फॉर्मल आणि एथनिक असे दोन्ही लूक मिळून जातात. ही जॅकेट घालून तुम्ही लेअरिंगचा इफेक्ट साधू शकता.