बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. फॅशन
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (13:01 IST)

ट्रान्सपरंट टॉपची फॅशन परतली...

सध्या तरुणी फॅशनेबल राहणे पसंत करतात. त्याचबरोबर त्या फॅशनेबल कपडेही घालतात. मग ते एखाद्या तरुणीने दुसर्‍या तरुणीच्या अंगावर घातलेले पाहिले की, तिलाही तसे कपडे घालण्याची आवड निर्माण होते. मग तिची ती आवड तिच्या लूकला सूट करो अथवा ना करो ती तरुणी ते कपडे घालते. सध्या बदलत्या फॅशननुसार लोकही बदलत असतात. तेही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे त्या त्या ऋतूमधले कपडे घालतात.
 
पहिले अन्न-वस्त्र-निवारा या लोकांच्या गरजा मानल्या जात असत, मात्र आता बदलत्या ऋतूनुसार बदलणे ही गरज आहे. आता बाजारात चलती आहे ती चायना जीन्स व त्यांवर वेअर केलेल्या ट्रान्सपरंट टॉपची. या टॉपमधून इनर घातले जाते. इनरची किंमत ५0 पासून २00 रपयांपर्यंत असते. तर या टॉपची किंमत १५0 ते ४00 रुपयांपर्यंत असते. ही फॅ शन सर्वसाधारण लोकांच्या खिशाला परवडणारी आहे. या टॉपचा फायदा उन्हाळ्यात व पावसाळ्यात खूप होतो. 
 
हे टॉप उन्हाळ्यात घातले की गरम होत नाही व पावसाळ्यात घातले की लवकर सुकते. त्या जीन्स व टॉपवर तरुणी डिझाईनर लॉकेट वेअर करतात. हातात प्रिंटेड बांगड्या व कानामध्ये मोठय़ा साईजचे कानातले सिल्वर किंवा गोल्डमध्ये घालतात. या टॉपमध्ये निळा, गुलाबी, पांढरा, काळा अशा रंगांना जास्त मागणी आहे. पण एक मात्र खरं बदलत्या काळानुसार आपले राहणीमान बदलत राहावे ही चांगली सवय आहे.