मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : सोमवार, 3 जून 2024 (09:23 IST)

Amul milk Price Hike: आजपासून अमूल दूध महागले, काय आहेत नवीन दर जाणून घ्या

amul milk
गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन दर आज 3 जूनपासून लागू होतील.नव्या किमतींनुसार प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. अर्धा लिटर दुधावर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे.

मूळ खर्चात वाढ झाल्याने आम्ही आमच्या दुधाच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने म्हटले आहे की, फेब्रुवारी 2023 पासून दुधाचे दर वाढवले ​​गेले नव्हते.ही वाढ खाद्यपदार्थांशी संबंधित सरासरी महागाईपेक्षा कमी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सर्व टप्प्यातील मतदान झाल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.अमूल गोल्ड, अमूल शक्ती, अमूल टी स्पेशल दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता अमूल गोल्डची किंमत 64 रुपये/लिटरवरून 66 रुपये/लिटर होणार आहे.  अमूल टी स्पेशलची किंमत 62 रुपयांवरून 64 रुपये प्रति लिटरपर्यंत केलीआहे. 

या बाबत अमूलने सांगितले की, फेब्रुवारी 2023 पासून किमतीत वाढ झालेली नसल्यामुळे आता 
किमतीत वाढ करण्यात आली आहे. दूध उत्पादन आणि ऑपरेशन खर्चात वाढ झाल्यामुळे किमतीत वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षी अमूलच्या दूध संघांनी शेतकऱ्यांच्या दरात सरासरी ६ ते ८ टक्क्यांनी वाढ केली होती.  हे नवीन दर आजपासून सुरु झाले आहे. 
 
Edited by - Priya Dixit