शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (17:59 IST)

मोदी सरकार आणणार 'सुपर अ‍ॅप'

modi farmers
शेतकऱ्यांनी त्यांच्या विकासासाठी आणि सोयीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मशी जोडले जाणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शेतकऱ्यांसाठी ‘super app’सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की, या अॅपमध्ये अनेक डिजिटल संस्था आणि विद्यमान मोबाइल अॅप्सचा समावेश केला जाईल. अशाप्रकारे, हे अॅप एक प्रकारचे व्यासपीठ असेल, जिथे सर्व प्रकारच्या समस्यांचे निराकरण एकाच छताखाली मिळू शकेल. म्हणजेच नवीन संशोधनापासून ते विकास, हवामान, बाजारातील अपडेट्स, उपलब्ध सेवा, सरकारी योजना आणि हवामानाशी संबंधित प्रत्येक माहिती शेतकऱ्यांना एकाच अॅपद्वारे मिळू शकणार आहे.
  
 कृषी मंत्रालय किसान सुविधा, पुसा कृषी, mKisan,Farm O Pedia,क्रॉप इन्शुरन्स अँड्रॉइड अॅप, Agrimarket,IFFCO किसान आणि ICAR कृषी ज्ञान यांसारखे सर्व अॅप्स एकत्रित करण्याचा विचार करत आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सर्व अॅप्स सुपर अॅपच्या अंतर्गत येत असल्याने शेतकऱ्यांना सेवा निवडण्यास मदत होईल. शेतकऱ्यांना संबंधित अॅप शोधणे सोपे व्हावे, हाच हे अॅप आणण्याचा उद्देश आहे.