बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 डिसेंबर 2023 (08:22 IST)

शेडनेटसाठी विमा योजना तयार करण्याबाबत हालचाली सुरू

devendra fadnavis
नागपूर : राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला व त्यात अनेक शेतक-यांनी लावलेले शेडनेट उडून गेले. या शेडनेटचा कुठलाही विमा नसल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. अशा संकटाच्या वेळी शेतक-यांना आधार मिळावा यासाठी शेडनेटसाठी विमा योजना तयार करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.
 
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेडनेटच्या नुकसानाचा मुद्दा उपस्थित केला होता. अगोदरच अवकाळीमुळे शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे. शासकीय योजनेअंतर्गत अनेक शेतक-यांनी शेडनेट लावले. मात्र वादळी पावसात ते उडून गेले.
 
शेडनेटचा कुठल्याही विमा योजनेत समावेश नसल्याने शेतक-यांसमोर मोठी समस्या उभी ठाकली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. या मुद्यावर मुख्यमंत्र्यां शी चर्चा झाली असून त्यांनी शेडनेटसाठी स्वतंत्र विमा योजना तयार करता येईल का यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.