गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 28 जुलै 2020 (16:32 IST)

‘लाँग टर्म इन्शुरन्स पॅकेज’ घेणे बंधनकारक

एक ऑगस्टनंतर नवीन कार किंवा बाइक खरेदी करताना पैशांची बचत होणार आहे. कारण, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा कंपन्यांना ‘लॉन्ग टर्म इन्शुरन्स पॅकेज’ न विकण्याचे आदेश दिले आहेत. म्हणजेच नवीन वाहन धारकांना गाडी खरेदी करतेवेळी ‘लाँग टर्म इन्शुरन्स पॅकेज’ घेणे बंधनकारक नसणार आहे. याचा थेट परिणाम वाहनांच्या ऑन रोड किंमतीवर होणार असून वाहने स्वस्त होतील.
 
या आदेशामुळे एक ऑगस्टनंतर ऑटो इन्शुरन्ससाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. एक ऑगस्टपासून कार आणि टू-व्हिलरच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये बदल होणार आहेत. इन्शुरन्स कंपन्यांना जून महिन्यात लॉन्ग टर्म इन्शुरन्स पॅकेज न विकण्याचे आदेश दिले होते. एक ऑगस्टपासून त्याला सुरूवात होईल. याअंतर्गत तीन किंवा पाच वर्षासाठी मोटर वाहन वीमा अनिवार्य करण्याचा नियम संपुष्टात आला आहे.