रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (13:15 IST)

Petrol Diesel Price Today: पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर,आजचे दर जाणून घ्या

petrol diesel
Petrol Diesel Price Today:देशातील तेल कंपन्यांनी देशातील प्रत्येक लहान आणि मोठ्या शहरांसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर या किमती ठरविण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने लादलेल्या व्हॅटमुळे त्यांची किंमत शहरानुसार बदलते. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात.
 
जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे ही किंमत ठरवली जाते. 2024 सुरू होण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील, अशी लोकांची अपेक्षा आहे. तथापि, गेल्या वर्षी मे 2022 पासून राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
 
कच्चे तेल प्रति बॅरल $ 72.05 आहे.पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी लागू नाही. यावर राज्य सरकारकडून व्हॅट (मूल्यवर्धित कर) लावला जातो. यामुळे सर्व शहरांमध्ये त्यांच्या किमती वेगवेगळ्या आहेत.मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे रोजचे दर 9224992249 एसएमएसद्वारे देखील जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल (IOC) ग्राहक RSP<डीलर कोड>  या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतो.
 
Edited By- Priya DIxit