रविवार, 8 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 29 नोव्हेंबर 2023 (08:38 IST)

Petrol-Diesel Price Today: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल,आजचे दर जाणून घ्या

petrol diesel
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर सर्वसामान्यांची नजर असते. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होत आहेत. तसं पाहिलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र आज 29 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आहे. 
 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत बरेच चढ-उतार होत असले तरी देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर तेच आहेत. राष्ट्रीय तेल कंपन्यांच्या नवीन अपडेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अद्याप कोणताही बदल झालेला नाही.

देशाची राजधानी दिल्लीत आजही एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे. यासोबतच देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये प्रति लिटर 
आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटरवर कायम आहे. त्याचवेळी, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर दर आहे.

राज्य सरकारे इंधनाच्या किमतीवर त्यांच्या स्वत:च्या नुसार व्हॅट लावतात, त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगवेगळे असतात. 
 
Edited by - Priya Dixit