सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 11 जुलै 2021 (11:50 IST)

आता 'एवढे' तास चालणार रेल्वेचे काम

सकाळी सात ते दुपारी चार आणि दुपारी चार ते रात्री बारा वाजेपर्यंत अशा दोन शिफ्टमध्ये आता रेल्वे विभाग काम करणार आहे. केंद्रीय रेल्वे विभागाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. 
 
हा आदेश केवळ रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे. यामुळे कामाच्या तासांमध्ये वाढ होणार आहे. रेल्वेमंत्री अश्वीनी वैष्णव यांनी याबाबत नुकतीच घोषणा केली. प्रवाशांना उत्तम सुविधा मिळावी आणि जलद गतीने काम व्हावे यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं.
 
तसंच केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही शुक्रवारी (9 जुलै) केंद्रीय राज्यमंत्री पदभार स्वीकारला. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली.