गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पॅन कार्ड काही क्षणात मिळणार

तुमचे पॅन कार्ड काही क्षणात मिळणार आहे. तर आता टॅक्‍स मोबाईलच्यायमातून भरु शकणार आहात अशी सुविधा सरकारने निर्माण केली आहे. केंद्राचे अर्थमंत्रालय आणि प्राप्तीकर विभाग करदात्यांचा त्रास कमी करण्यासाठी लवकरच नवे मोबाईल ऍप लॉन्च करणार आहे. पॅन कार्डही तत्काळ उपलब्ध करुन देण्यासंदर्भातील प्रकल्पावर काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. डायरेक्‍टोरेट ऑफ सिस्टीमच्या देखरेखीखाली केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (CBDT) या दोन्ही उपक्रमांवर काम करत आहे.
 
सीबीडीटीने आधारच्या ई-केवायसीच्या सुविधेचा वापर करुन, काही क्षणातच पॅन कार्ड उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी सीबीडीटी आणि कॉर्पोरेट मंत्रालयाने एका नव्या कंपनीला केवळ एका अर्जच्या माध्यमातून चार तासांच्या आत पॅन कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी करार केला आहे. जर ई-केवायसीच्या माध्यमातून सिमकार्ड देता येऊ शकते, तर त्याचमाध्यमातून पॅन कार्डही देता येऊ शकतं होता. ते काम तत्काळ पूर्ण होत असल्याने पाच ते सहा मिनिटात त्या व्यक्तीला पॅन कार्ड उपलब्ध करुन देणे शक्‍य होणार असल्याचे एका संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे. याशिवाय प्राप्तीकर विभाग एक नवे स्मार्टफोन ऍप ही विकसित करत असून, याच्या माध्यमातून ऑनलाईन टॅक्‍स भरण्याच्या प्रक्रियेला हातभार लागणार आहे.