सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 23 नोव्हेंबर 2023 (21:56 IST)

राहीलेले कांदा अनुदान एकरकमी द्या

onion
नाशिक :राहीलेले कांदा अनुदान एकरकमी मिळवण्यासाठी बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटने कडून करण्यात आली आहे. १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपयांचे अनुदान राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. यापैकी अनेक शेतकऱ्यांना एक किंवा दोन हप्ता तर अनेक शेतकऱ्यांना एकही हप्ता कांदा अनुदान खात्यावर जमा झालेले नाही.
 
लासलगाव बाजार समितीमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना राहिलेले कांदा अनुदान एकरकमी मिळावे. यासाठी बाजार समिती पदाधिकारी, अधिकारी यांनी थेट मुंबईत जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सरकारने कांदा उत्पादकांचे राहीलेले सर्व कांदा अनुदान एकरकमी तत्काळ द्यावे अशी मागणी करावी. यासाठी लेखी पत्राद्वारे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांनी  मागणी केली आहे केली आहे लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांना तसे पत्र देण्यात आले आहे.
 
राज्यातील सर्व बाजार समित्यांनीही राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचे राहीलेले कांदा एकरकमी मिळावे याकरिता पाठपुरावा करावा यासाठी त्या बाजार समित्यांना पत्र दिले जाणार आहे अशी माहिती कांदा संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. मुंबई वाशी मार्केटमध्ये व परराज्यात विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाही या कांदा अनुदान योजनेत समावेश करावा यासाठीही कांदा संघटनेकडून राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे
 
१ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ज्या ज्या शेतकऱ्यांकडे बाजार समित्यांमध्ये कांदा विक्री केल्याची मुळ पावती आहे. परंतु कांदा अनुदान योजनेतून त्यांना वगळले आहे. अशा सर्व शेतकऱ्यांनाही कांदा अनुदान द्यावे यासाठीही सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे असेही दिघोळे यांनी यावेळी सांगितले.