डीझेल स्वस्त तर पेट्रोल महाग
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे झालेले अवमूल्यन कच्च्या तेलाचे वाढलेले भाव देशभरात बुधवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल महागले आहे. डिझेलच्या दरात मात्र कपात करण्यात आली आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू झाले आहेत.
पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 13 पैशांनी वाढ केली आहे. तर डिझेलचे दर प्रतिलिटर 12 पैशांनी कमी करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे सध्याचे भाव आणि रुपये डॉलरचे दर या आधारे पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये बदल करण्यात आल्याचे पेट्रोलियम कंपन्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.