दरवाढ : पेट्रोल 2 रुपये 21 पैसे , तर डिझेल 1 रुपये 79 पैशांची वाढ
आधीपासून व्यक्त करण्यात आलेल्या शक्यतेनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपये 21 पैशांना वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 1 रुपये 79 पैशांची वाढ करण्यात आली आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. तेल उत्पादक व निर्यातदार देश (ओपेक) पुढील महिन्यापासून तेल उत्पादनात कपात करणार आहेत. त्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किमती आगामी तीन ते चार महिन्यांत ५ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात.