पेट्रोल, डिझेलची अल्प दरवाढ
या महिन्यामधील डिझेल व पेट्रोलच्या किमतीत रविवारी मध्यरात्रीपासून किंचितशी वाढ करण्यात आली आहे. या वाढीनुसार पेट्रोलची किंमत एक लिटरला एक पैशाने तर डिझेलची किंमत प्रति लिटर ४४ पैशांनी वाढली आहे. या आधी १६ एप्रिलला देशभरातील पेट्रोल व डिझेलच्या किमतीत प्रति लिटरला अनुक्रमे एक रुपया ३९ पैसे व १ रुपया ४ पैसे वाढ करण्यात आली होती.