मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 30 मार्च 2022 (10:47 IST)

Petrol Diesel Price : आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 75 ते 85 पैशांनी वाढ

तेल कंपन्यांनी आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात 76 ते 85 पैशांनी वाढ झाली आहे, तर डिझेलच्या दरातही 67 ते 75 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोलच्या दरात 80 पैशांनी तर डिझेलच्या दरातही 80 पैशांनी वाढ झाली आहे.
 
मुंबईत पेट्रोलच्या दरात 84 पैशांनी तर डिझेलच्या दरात 85 पैशांनी वाढ झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात 84 पैशांनी, तर डिझेलच्या दरात 80 पैशांनी वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दरात 75 पैशांनी, डिझेलच्या दरात 76 पैशांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबरपासून या दोन्ही इंधनांच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. 
 
पाच राज्यांतील निवडणुकांमुळे मोदी सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढवण्यापासून रोखल्याचा आरोप सरकारच्या राजकीय विरोधकांनी केला. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 112 डॉलरवर पोहोचल्यानंतर तेल कंपन्यांनी रविवारी डिझेलच्या मोठ्या खरेदीदारांसाठी प्रति लिटर 25 रुपयांनी वाढ केली. हळूहळू किरकोळ दरात वाढ केली जाईल, असे तेल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहे .
 
दिल्ली मध्ये पेट्रोलचे दर 101.01 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.27 आहे. 
मुंबई मध्ये पेट्रोल चे दर 115.88 रुपये प्रति लिटर तर डिझेल 100.10 आहे.
कोलकाता मध्ये पेट्रोल चे दर 110.52 रुपये प्रति लिटर तर डिझेल 95.42 आहे
चेन्नई मध्ये पेट्रोल चे दर 106.69 रुपये प्रति लिटर तर डिझेल 96.76 आहे.