मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑगस्ट 2022 (10:13 IST)

Petrol Price Update Today: पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर,दर तपासा

petrol diesel
Petrol Price Update Today: आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा एकदा प्रति बॅरल 104 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत.असे असले तरी हरितालिका तृतिया घेऊन आलेला हा मंगळवार दिलासा देणारा आहे.पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.मेघालय आणि महाराष्ट्र वगळता राजस्थान, गुजरात, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या सर्व राज्यांमध्ये सलग 101 व्या दिवशी कोणताही बदल झालेला नाही.  तुमच्या शहरात दर काय आहेत?जाणून घ्या.
 
महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केल्यानंतर आता देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या श्री गंगानगरमध्ये मिळत आहे.यापूर्वी महाराष्ट्रातील परभणीमध्ये सर्वात महाग पेट्रोल उपलब्ध होते.मुंबई 106.31 94.27श्री गंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 29.39  रुपयांनी स्वस्त आहे, तर डिझेलही 18.50 रुपयांनी स्वस्त आहे.पोर्ट ब्लेअरमध्ये 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये लिटर आहे.