रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 25 जानेवारी 2021 (12:43 IST)

PNB खातेधारक 1 एप्रिलपासून करु शकणार नाही ट्रांजेक्शन, जर हे केले नाही

देशातील सर्वात दुसरी मोठी शासकीय बँक पंजाब नेशनल बँकेने आपल्या खातेधारकांना सतर्क केले आहे. बँकेने आपल्या सर्व खातेधारकांना 31 मार्च 2021 पर्यंत जुन्या आईएफएससी (IFSC) आणि एमआईसीआर (MICR) कोड आणि जुन्या चेकबुक बदलवण्याची अपील केली आहे. असे न केल्यास ग्राहक 1 एप्रिल 2021 पासून आपल्या बँक खात्यातून देण-घेण करु शकणार नाही.
 
पंजाब नेशनल बँकेने आपल्या ग्राहकांना ट्विट करत ही माहिती पुरवली आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना 31 मार्च पर्यंत आपल्या जुन्या IFSC आणि MICR Code बदलण्यास सांगितले आहे. हे जुने कोड 1 एप्रिल पासून बदलले जातील. अर्थात 31 मार्च 2021 नंतर हे जुने कोड कामास येणार नाही. म्हणजेच 1 एप्रिलपासून ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी नवीन कोडची आवश्यकता भासेल. बँकेने ट्वीट करुन चेक आणि IFSC/MICR code बद्दल महत्त्वाची माहिती शेअर  केली आहे.
 
उल्लेखनीय आहे की ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (oriental bank of commerce) आणि युनाइटेड बँक ऑफ इंडिया (united bank of india) चे विलिनीकरण पंजाब नेशनल बँकेत झालेले आहेत. आता या दोन्ही बँकांचे ग्राहक पीएनबी चे ग्राहक झाले आहेत. आता या ग्राहकांना देण-घेण यासाठी बँकेकडून आपलं नवीन चेकबुक आणि आईएफएससी किंवा एमआईसीआर कोड घ्यावं लागेल. ग्राहक टोल फ्री नंबर 18001802222/18001032222 वर फोन करुन अधिक माहिती मिळवू शकतात.