15 ऑगस्टपासून 301 रेल्वेच्या वेळेत बदल
उत्तर रेल्वेने एक-दो नव्हे तर 301 रेल्वेच्या वेळेत बदल केले आहेत. नवीन वेळापत्रक 15 ऑगस्टपासून लागू केले जाईल. उत्तर रेलवेने 57 ट्रेनचे डिपार्चर टाईम पुढे आणि 58 ट्रेनचे मागे केले आहेत.
ऐवढेच नाही तर 102 रेल्वेचा अराईवल टाइम पुढे तर 84 रेल्वेचा मागे सरकवण्यात आले आहे. रेल्वे ने प्रवाश्यांना रेल यात्रा सुरु करण्यापूर्वी चौकशी करण्याचा अपील केली आहे.
नवीन वेळापत्रक प्रमाणे
अमृतसरहून चालणारी शताब्दी एक्सप्रेस: पहाटे 4.55
देहरादूनहून सुटणारी शताब्दी एक्सप्रेस: सांयकाळी 4.55
हजरत निजामुद्दीनहून हमसफर एक्सप्रेस: 8.25
दिल्लीहून हिमाचल एक्सप्रेस: 10.50
हरिद्वारहून लोकमान्य टिळक सुपरफास्ट एक्सप्रेस: 6.30
आनंद विहारहून गरीब रथ एसी एक्सप्रेस: रात्री 8.40
आनंद विहार टर्मिनलहून तेजस एक्सप्रेस: 3.45