बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated :नवी दिल्ली , बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (12:46 IST)

विमानतळावर जाण्यापूर्वी ही महत्त्वाची बातमी वाचा, बदलणार आहेत Check Inचे नियम

जर तुम्ही अनेकदा फ्लाइटने प्रवास करत असाल आणि दोन-तीन हॅण्ड बॅग सोबत घेऊन जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे एकापेक्षा जास्त बॅग घेऊन प्रवास करण्याची परवानगी असणार नाही. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने १९ जानेवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकात या संदर्भातील आदेश जारी करण्यात आला आहे.
 
गर्दी कमी करण्याचा उद्देश आहे
प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि स्क्रीनिंग पॉइंटवरील गर्दी कमी करण्यासाठी हा नवा नियम करण्यात आला आहे. सर्व विमानतळांवर 'वन हँड बॅग रुल' नियम लागू करण्याचे आदेश बीसीएएसकडून देण्यात आले आहेत. यानंतर एका प्रवाशाला फक्त एक बॅग घेऊन प्रवास करता येणार आहे.
 
रांगेत उभे राहिल्याने त्रास वाढतो
परिपत्रकात म्हटले आहे की, अनेकदा प्रवासी स्क्रिनिंग पॉईंटवर दोन किंवा तीन हाताच्या पिशव्या आणतात. यामुळे त्यांना क्लीयरेंससाठी अधिक वेळ लागतो. यामुळे अनेक वेळा काही प्रवाशांना बराच वेळ रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे विमानतळावर गर्दी वाढत असून इतर प्रवासीही नाराज झाले आहेत.
 
नवीन नियम लवकरात लवकर लागू करण्याचे आदेश
'वन हँड बॅग नियम' लवकरात लवकर काटेकोरपणे लागू करावा, असेही बीसीएएसकडून सांगण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना सेफ्टी क्लिअरन्स देणे सोपे होईल आणि सुरक्षेच्या इतर समस्याही कमी होतील. या संदर्भात प्रवाशांना सल्ला देण्यासाठी विमान कंपन्यांनीही कर्मचारी तैनात करावेत. कोविड-19 ची सतत वाढत जाणारी प्रकरणे लक्षात घेऊन हे पाऊल उचलले जात असल्याचे मानले जात आहे.