गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 30 मार्च 2020 (22:10 IST)

करोना व्हायरस: रिलायन्स इंडस्ट्रीजकडून ५०० कोटींची मदत

करोना व्हायरसच्या संकटाला सामोरा जाण्यासाठी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने ५०० कोटींची आर्थिक मदत जाहीर केली आहे. अलीकडेच टाटा ग्रुपने १५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहेत. टाटा समूहाने शनिवारी आजवरची सर्वात मोठी आर्थिक मदत जाहीर केली होती.
 
रिलायन्स इंडस्ट्रीजने पंतप्रधान नागरीक सहाय्यता निधीला ५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 
 
आर्थिक मदतीशिवाय रिलायन्सने करोनाग्रस्त रुग्णांसाठी डेडीकेटेड १०० बेडची क्षमता अससेले रुग्णालयही उभे केले आहे. रिलायन्सचे दिवसला १ हजार मास्कची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.