मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 20 एप्रिल 2019 (17:15 IST)

रिलायन्स जिओचा 3 हजार कोटींचा नफा, फक्त अडीच वर्षांत 30 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओने 2018-19 मध्ये 2,964 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे युनिट रिलायन्स जिओने सुमारे अडीच वर्षांपूर्वीच देशातील दूरसंचार क्षेत्रात पाऊल टाकले होते आणि फक्त 30 महिन्यात 30 कोटी ग्राहकांची संख्या ओलांडली आहे.
 
गुरुवारी कंपनीच्या घोषित परिणामानुसार गेल्या 31 मार्च रोजी समाप्त झालेल्या आर्थिक वर्षात त्यांना 15,102 कोटी रुपयांच्या कर पूर्वी नफा झाला आहे. 1 वर्षा पूर्वीच्या तुलनेत सव्वा दोन वेळा जास्त होते. ऑपरेटिंग मार्जिन 38.9 टक्के राहिली. संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत रिलायन्स जिओचा कर पूर्वीचा नफा 4,053 कोटी रुपये होता, आणि जे तिसऱ्या तिमाहीत 13.4 टक्के जास्त आहे. 
 
कंपनीच्या इतर व्यवसायात देखील अंबानीने मजबूत वाढीसाठी अभिनंदन करताना म्हणाले की मला रिलायन्स संघाचा अभिमान आहे. या यशात रिलायन्स संघाचा कठोर परिश्रम आणि समर्पण आहे. रिलायन्स जिओचा 2018-19 मध्ये प्रति ग्राहक महसूल (एआरपीयू) 126.2 रु राहिलं आहे. चवथ्या तिमाहीत जिओ ग्राहकांनी सरासरी दरमहा 10.9 जीबी डेटा वापरला आणि 823 मिनिटे व्हॉईस कॉल केली. तसेच याच तिमाहीत 2.7 कोटी ग्राहक कंपनीशी जुळले. या काळात ग्राहकांनी 956 कोटी जीबी वायरलेस डेटा वापरला आणि एकूण 72,414 कोटी मिनिटे गोष्टी केल्या. 
 
त्याचवेळी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय) च्या ताज्या आकडेवारीनुसार वायरलेस ग्राहकांच्या बाजारात जिओचा भाग फेब्रुवारीच्या अखेरीस 25.11 टक्के झाले. या महिन्याच्या दरम्यान कंपनीने 77,93,440 ग्राहक जोडले.