सेबीकडून रिलायन्सवर वर्षभरासाठी बंदी
सेबीने रिलायन्सवर शेअर बाजारात डेरिव्हेटिव्ह व्यवहार करण्यावर वर्षभरासाठी बंदी घातली आहे. रिलायन्ससोबतच अन्य 12 कंपन्यांवरही ही कारवाई करण्यात आली आहे. मुकेश अंबानींच्या या कंपनीवर फ्यूचर अॅण्ड ऑप्शन्स (F&O) व्यवहारात फसवणूक केल्याच्या दहा वर्ष जुन्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. यासोबतच सेबीने मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला सुमारे एक हजार कोटींचा दंडही ठोठावला आहे. हे सर्व पैसे व्याजासकट परत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. परंतु सेबीच्या या निर्णयाविरोधात रिलायन्स इंडस्ट्रीज सिक्युरिटीज ट्रिब्युनलकडे दाद मागणार आहे. हे प्रकरण रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स पेट्रोलिअमशी संबंधित आहे. रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअरमध्ये डेरिव्हेटिव्ह व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.