सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (11:52 IST)

रिलायन्स जिओचे रिचार्ज प्लॅन आजपासून 700 रुपयांनी महागले, जाणून घ्या कोणत्या प्लानमध्ये किती वाढ झाली

रिलायन्स जिओने रविवारी आपले प्रीपेड रिचार्ज प्लॅन महाग करण्याची घोषणा केली, आजपासून म्हणजेच 1 डिसेंबरपासून हे प्लॅन महाग झाले आहेत. जिओचे रिचार्ज प्लॅन 700 रुपयांपर्यंत महाग झाले आहेत. जिओच्या वेबसाइटनुसार, कंपनीच्या ३,४९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये सर्वाधिक ७०० रुपयांची वाढ झाली आहे. हा प्लॅन आता 4,199 रुपयांचा झाला आहे. याआधी Airtel आणि Vodafone Idea ने देखील त्यांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. Airtel आणि Vi चे अपडेट केलेले प्लॅन गेल्या आठवड्यात लाइव्ह झाले. रिलायन्स जिओचा कोणता प्लॅन रुपयांनी महाग झाला आहे.
 
जिओचे हे प्लॅन महागले
रिलायन्स जिओच्या रिलीझमध्ये जिओ फोनचा ७५ रुपयांचा प्लान ९१ रुपयांचा झाल्याचे नमूद करण्यात आले होते. म्हणजेच हा प्लान 16 रुपयांनी महाग झाला आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, मोफत कॉलिंग, 3GB डेटा आणि 50SMS देण्यात आला होता. मात्र, Jio च्या वेबसाइटनुसार, 75 रुपयांचा प्लान महाग करण्यात आलेला नाही. परंतु, वैधता 23 दिवसांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच, प्लॅनसाठी उपलब्ध डेटा देखील 2.5GB पर्यंत कमी करण्यात आला आहे. प्लॅनमध्ये दररोज 100MB डेटा मिळेल. याशिवाय 200 एमबी अधिक डेटा दिला जाईल.  
 
जिओ फोनचे प्लॅन 150 रुपयांनी महागले आहेत, जिओ फोनचे इतर प्लॅनही महाग झाले आहेत. 125 रुपयांचा नवीन प्लॅन आला आहे, ज्यामध्ये 23 दिवसांची वैधता दिली जात आहे. प्लॅनमध्ये 11.5GB डेटा दिला जात आहे. प्लॅनमध्ये मोफत कॉलसह 300 एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याच वेळी, 125 रुपयांचा जुना प्लॅन आता 152 रुपयांना मिळणार आहे. हा प्लान 27 रुपयांनी महाग झाला आहे. तर 155 रुपयांचा जुना प्लॅन आता 186 रुपयांना मिळणार आहे. हा प्लान 21 रुपयांनी महाग झाला आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता, मोफत कॉल्स आणि दररोज 1GB डेटा मिळतो. प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. Jio Phone चा 185 रुपयांचा जुना प्लॅन आता 222 रुपयांना मिळणार आहे. म्हणजेच हा प्लान पूर्वीच्या तुलनेत 37 रुपयांनी महाग झाला आहे. जिओ फोनचा ७४९ रुपयांचा ११ महिन्यांचा प्लॅन आता ८९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच हा प्लान 150 रुपयांनी महाग झाला आहे.