Realmeच्या स्मार्टफोनची ४ सप्टेंबरलापासून फ्लिपकार्टवर विक्री
काही महिन्यांपूर्वी Realmeने ओप्पोचे सर्व ब्रॅण्ड मार्केटमध्ये आणले. त्यानंतर Realme ही वेगळी कंपनी बनवली आहे. ओप्पो ही Realme ची पॅरेंट्स कंपनी आहे. Realme २ नवा स्मार्टफोन Realme १ चे अपग्रेड वर्जन आहे. या स्मार्टफोनची ४ सप्टेंबरला १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर विक्री सुरू होणार आहे. एचडीएफसी बॅंक डेबिट/क्रेडिट कार्ड यूजर्सना हा फोन ७५० रुपयांच्या डिस्काऊंटवर मिळणार आहे. म्हणजेच त्यांना हा फोन ८ हजार २४० रुपयांमध्ये मिळणार आहे. एक्स्चेंज ऑफरनुसार फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला पाचशे रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे. रिलायन्स जियो ग्राहक १२० जीबी आणि ४ जी डाटा व्यतिरिक्त ४२०० रुपयांचा कॅशबॅकचा लाभही मिळणार आहे.
Realme २ मध्ये फेस अनलॉक, ४ हजार २३० एमएच बॅटरी, ड्युअल ४ जी बी ओएलटीई आणि ४ जीबी रॅम आहे. Realme १ मध्ये ६ जीबी रॅम वाला स्मार्टफोन पण आहे. याशिवाय स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसरही आहे. या फोनमध्ये बॅक फिंगरप्रिंट सेंसर आहे जो Realme १ मध्ये नाहीए. किंमतीच्या बाबतीत या फोनची स्पर्धा शाओमी रेडमी ५ आणि नोकीया ३.१ अशा हॅंडसेटसोबत होईल.