गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जून 2024 (14:00 IST)

सलग आठव्यांदा रेपो रेटमध्ये बदल नाही, रेपो रेट 6.5 टक्क्यांवर कायम

Bank
निवडणुकीनंतरच्या पहिल्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. सध्या रेपो दर 6.5 टक्के आहे.
 
रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2022 मध्ये रेपो दर वाढवण्यास सुरुवात केली आणि आत्तापर्यंत 250 बेसिस पॉइंट्सने त्यामध्ये वाढ केली आहे.
 
महागाई दर हे अजूनही आरबीआयसमोरचं आव्हान आहे. मात्र, किरकोळ महागाई दरात घट होण्याची चिन्हे आहेत. अन्नधान्याची चलनवाढ कायम आहे.
 
सध्या मान्सूनचे आव्हान कायम आहे. मात्र, मान्सूनचा पाऊस चांगला होण्याची शक्यता असल्याचे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले. विकास दरही चांगला असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये विकास दर 8.2 टक्के राहिला आहे.

Published By- Dhanashri Naik