बुधवार, 18 फेब्रुवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 6 डिसेंबर 2017 (15:28 IST)

गुंतवणूकदारांनो, बिटकॉइनपासून दूर रहा

reserve bank of india

गुंतवणूकदारांमध्ये दिवसेंदिवस आकर्षन वाढत असलेल्‍या बिटकॉइनपासून गुंतवणूकदारांना दूर राहण्याचा सल्‍ला  रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिला आहे. आरबीआयने यापूर्वीही बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे सांगितले होते. 

बिटकॉइनच्या मूल्यामध्ये वाढ आणि इनिशियल कॉइनच्या ऑफर्स (ICO)मधील अधिक वाढ झाल्याने, त्यावर बँकेने यावेळी चिंता व्यक्त केली होती. मागच्या आठवड्यात एका बिटकॉइनचे मूल्य तब्बल ११ हजार डॉलर्सवर पोहोचले होते. ज्यामुळे सर्वांनाच धक्का दिला होता. बिटकॉइनचे नियंत्रण कोणत्याही मौद्रिक प्राधिकरणाच्या माध्यमातून होत नाही.