मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Updated : गुरूवार, 2 मार्च 2023 (17:36 IST)

व्हॅलेंटाईन वीकमुळं गुलाबाच्या दरात वाढ; शेतकऱ्यांना होतोय फायदा

तरुणांसाठी फेब्रुवारी महिना खास असतो. कारण फेब्रुवारीला ‘प्रेमाचा महिना’ असं म्हटलं जातं . 7 फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरु झाला असून हा आठवडा प्रेमिकांना प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो.
व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी) हा आठवड्याचा शेवटचा दिवस असतो. या व्हॅलेंटाईन वीकमुळं गुलाबाच्या फुलांना मोठी मागणी असते. सध्या मागणी वाढल्यामुळं गुलाबाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये गुलाबाची फुले देण्याची प्रथा आहे. गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक मानलं जाते. सध्या गुलाबाला चांगली मागणी वाढली आहे. त्यामुळं दरातही मोठी वाढ झाली आहे. गुलाबाची शेती ही शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे.
 
फुलांची मागणी वाढल्यानं त्याचा थेट फायदा फुलांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना होत आहे. देशातील विविध बाजारपेठांमध्ये गुलाबाच्या फुलांचे दर वाढले आहेत. सध्या 8 ते 10 रुपयांना विकले जाणारे गुलाबाचे फुल 40 ते 50 रुपयांना विकले जात आहे. तर गुलाबाच्या पुष्पगुच्छाची किंमत हजारो रुपयांपर्यंत सांगण्यात येत आहे. त्यामुळे गुलाबाच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे .
गाझीपूर बाजारपेठेत 70 टक्के फुलांची निर्यात बंगळुरू आणि नागपूरमधून उत्तर प्रदेशच्या गाझीपूर बाजारपेठेत 70 टक्के फुलांची निर्यात बंगळुरू आणि नागपूरमधून होते. पांढऱ्या, पिवळ्या, फॅमिलिया, केशरी रंगाचे गुलाब तसेच जरबेराची फुलेही येथून गाझीपूर मंडीत येतात. उत्पन्नानुसार बाजारभाव ठरवला जात असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फुलांची आवक जास्त आणि विक्री कमी असेल तर भाव खाली येतात. तर आवक कमी आणि मागणी वाढली की फुलांच्या दरातही वाढ होते. याचा शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पुढचे काही दिवस फुलांचे दर तेजीत राहणार असल्याचा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे. त्यामुळं त्याचा फायदा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.