रॉयल एनफील्डने त्याच्या 7,000 बाइक्स परत मागवल्या, जाणून घ्या कारण
मोटरसायकल कंपनी रॉयल एनफील्डने आपल्या बुलेट आणि बुलेट इलेक्ट्राच्या सुमारे 7,000 मोटरसायकल परत मागवल्या आहे. मंगळवारी कंपनीने सांगितले की या वाहनांमध्ये त्रुटिपूर्ण ब्रेक कॅलिपर बोल्टची ओळख करण्यात आली आहे.
कंपनीने एका वक्तव्यात म्हटले आहे की 20 मार्च 2019 ते 30 एप्रिल 2019 दरम्यान तयार केलेल्या या वाहनांमध्ये ही त्रुटी ओळखण्यात आली आहे. म्हणूनच कंपनी आधीच सक्रिय झाली असून त्याने या वाहनांना सर्व्हिससाठी परत बोलवले आहे.
ब्रेक कॅलिपर बोल्ट, गाडीतील ब्रेकिंग सिस्टिमचा एक प्रमुख भाग आहे. हे ब्रेक होज आणि ब्रेक कॅलिपर सुरक्षित करते.