शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (11:44 IST)

ज्येष्ठ नागरिकांना आता रेल्वेच्या तिकिटावर कोणतीही सूट मिळणार नाही, पूर्ण पैसे द्यावे लागतील

भारतीय रेल्वे: रेल्वेने निर्णय घेतला आहे की ते ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांवर उपलब्ध असलेल्या सवलतींवरील ऑफर बंद करत आहेत. म्हणजेच आता जे वयोवृद्ध प्रवासी ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी जातील, त्यांना तिकिटात सवलत मिळणार नाही.
 
कोरोनाच्या काळात रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांवर सवलत जाहीर केली होती. अशा परिस्थितीत, आता परिस्थिती ठीक आहे, रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांवर उपलब्ध असलेल्या सवलतींवरील ऑफर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, "ज्येष्ठ नागरिकांना तिकिटांवर दिल्या जाणाऱ्या सवलतींवर तात्काळ बंदी राहील." म्हणजेच आता जे ज्येष्ठ नागरिक  ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी जातील, त्यांना तिकिटात सवलत मिळणार नाही. 
 
सध्या 3 वर्गातील प्रवाशांना सूट मिळणार आहे.
कोरोनाच्या काळात जेव्हा रेल्वे प्रवाशांसाठी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली होती, तेव्हा तिकिटावरील सवलत बंद करण्यात आली होती. पण काही स्पेशल कॅटेगरीच्या लोकांना भाड्यात सवलत देणे पुन्हा सुरू झाले. यामध्ये  4 श्रेणी चे अपंग, 11गंभीर आजाराने ग्रस्त  रुग्ण आणि विद्यार्थ्यांना भाड्यात सवलत मिळू लागली.
 
कोरोनाच्या काळात रेल्वे सेवा बंद होती. अशा स्थितीत रेल्वेला मोठा फटका सहन करावा लागला. कोरोनामुळे लोकांनी प्रवास बंद केला होता. अशा स्थितीत ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय घट झाली होती, त्यामुळे तिकिटांची विक्री बंद करण्यात आली होती. अशा परिस्थितीत भारतीय रेल्वेच्या उत्पन्नावर वाईट परिणाम झाला.
 
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'प्रवाशांना देण्यात आलेल्या सवलतीचा भारतीय रेल्वेवर खूप बोजा पडतो, त्यामुळे रेल्वेने निर्णय घेतला आहे की, सध्याच्या काळात वृद्धांना रेल्वे भाड्यात सवलती देण्यावर असलेले निर्बंध कायम राहतील आणि त्यांना ही उर्वरित  प्रवाशांप्रमाणे पूर्ण भाडे द्यावे लागेल.