गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 26 जुलै 2017 (09:32 IST)

टाटा समुहात जाण्यास शिखा शर्माचा ईन्कार

ऍक्‍सीस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी शिखा शर्मा अधिकारी टाटा समुहात जाणार असल्याच्या वृत्ताचा बॅंकेच्या प्रवक्‍त्याने इन्कार केला आहे.
 
अगोदर काही वृत्तमाध्यमात आलेल्या बातम्यानुसार टाटा समुहाने शर्मा यांना समुहातील वित्तीय विभागाच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. याचा बॅंकेने इन्कार केला असून याबाबत काढलेल्या निवेदनात म्हटले आहे की असे निर्णय हे बॅंकेचे संचालक मंडळ घेत असते. त्यासाठी ठरऊन दिलेली एक पध्दत आहे.
 
अश्‍या प्रकारच्या बातम्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. या अगोदर आलेल्या वृत्तानुसार शर्मा यांची मुदत पुढील वर्षाच्या सुरूवातीला संपत असल्यामुळे बॅंकेने नव्या व्यक्तीचा शोध सुरू केला असल्याचे बोलले जात होते.
 
शर्मा बॅंकेत 2009 पासून रूजु झाल्या असून त्याना आतापर्यंत तीन वेळा मुदत वाढ मिळालेली आहे. शर्मा यांच्या कार्यकाळात बॅंकेने चांगली कामगीरी केली आहे. बॅंकेचा नफा आणि उलाढाल वाढलेला आहे. मात्र गेल्या काही तिमाहीत बॅंकेवरील अनुत्पाक कर्जामुळे बॅंकेच्या ताळेबंदावर परिणाम झालेला आहे.