शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

राम भक्तांसाठी रेल्वेची विशेष रामायण एक्सप्रेस

रामाशी निगडित असणाऱ्या धार्मिक स्थळांना भेट देणारी भारतीय रेल्वे रामायण सर्किट यात्रा या वर्षी देखील भाविकांसाठी आयोजित केली जाणार आहे. ही रेल्वे भारत आणि श्रीलंकेत प्रभू श्रीराम यांच्याशी निगडित धार्मिक स्थळांवर रवाना होते. भारतासाठी ट्रेन तर श्रीलंकेसाठी प्रवास विमानाने करता येतो.
 
रेल्वे प्रशासनाने 2018 मध्ये विशेष पर्यटन ट्रेनचे चार पॅकेज दिले होते. मागी वर्षाप्रमाणे या वर्षी नोव्हेंबरमध्ये दोन पॅकेज येतील. भारतीय स्थळांसाठी 16 दिवस आणि 17 रात्रीचा एकूण खर्च प्रवश्यांना 16,065 जमा करावा लागणार असून श्रीलंकेसाठी 36, 950 रुपये प्रती व्यक्ती आकाराले जातील. 
 
पहिली ट्रेन श्री रामायण यात्रा 3 नोव्हेंबरला राजस्थानच्या जयपुरहून रवाना होईल. दुसरी ट्रेन रामायण एक्स्प्रेस मध्य प्रदेशाच्या इंदूर येथून 18 नोव्हेंबर रोजी सुटेल. 
 
तिकीट आरक्षित करायचे असल्यास आयआरसीटीसीच्या (irctc)साईटवरुन करु शकता. याशिवाय देशात असलेल्या आयआरसीटीसीच्या २७ सुविधा केंद्रांमध्येही हे आरक्षण करता येईल.
 
भारत आणि श्रीलंकेमधील रामाशी जोडलेल्या सर्व स्थळांना भेट देण्यासाठी या खास रेल्वेचा उपक्रम सुरु आहे. आयोध्या, हनुमान गढी, नंदीग्रामाचे मंदिर, सतीमाढी, तुलसी मानस मंदिर आणि संकट मोचन मंदिर, रामकोट, कनक भवन मंदिर, जनकपूर, वाराणसी, प्रयाग श्रृंगवेरपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वर याठिकाणी जाईल. त्यानंतर ज्यांना श्रीलंकेतील रामाची स्थळे पाहायची आहेत त्यांना विमानाने त्याठिकाणी नेण्यात येईल.
 
श्रीलंकेत कँडी, नुवारा एलिया, कोलंबो, नेगोंबो येथे रामायण काळातील संबंधित स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. या संपूर्ण पॅकेजमध्ये जेवणाची आणि राहण्याची सुविधा देण्यात आली आहे.