सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

एलटीटी ते नागपूर विशेष गाडी धावणार

लोकमान्य टिळक ते नागपूर दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक ते नागपूर एकेरी गाडी क्रमांक 02021 डाऊन सुपर फास्ट विशेष रेल्वे गाडी लोकमान्य टिळकहून रविवार, १५ सप्टेंबर रोजी ३.५० वाजता सुटेल व नागपूरला सोमवारी ६.३० वाजता पोहोचेल.

या गाडीला कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला १५  द्वितीय शयनयान व दोन सर्व साधारण डबे राहणार असून या गाडीचे आरक्षण १२ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. प्रवाश्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले आहे.