शनिवार, 17 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 24 मे 2017 (09:38 IST)

स्पाइसजेटच्या 12 व्या वर्षपूर्तीनिमित्त ऑफर, केवळ 12 रुपयांत विमान तिकीट

spice jet offer flight booking only 12-rupees

लो कॉस्ट एअरलाइन्सच्या स्पाइसजेट या कंपनीने 12व्या वर्षपूर्तीनिमित्त प्रवाशांना ऑफर भेट  दिली आहे. या ऑफर अंतर्गत 23 मे ते 28 मे 2017 रोजीपर्यंत तुम्ही तिकीट बुक करू शकता. या दिवसांत केवळ 12 रुपयांत तिकीट बुक करू शकतात. तिकीट बुक केल्यामुळे प्रवासी 26 जून ते 24 मार्च 2018पर्यंत प्रवास करू शकतात. मात्र यासाठी प्रवाशांना एअरपोर्ट टॅक्स आणि इतर सरचार्ज वेगळे द्यावे लागणार आहेत. कंपनीकडे या ऑफरसाठी मर्यादित तिकिटं उपलब्ध आहेत. या ऑफरनंतर एक लकी ड्रॉसुद्धा काढण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना मोफत आंतरराष्ट्रीय तिकिटं जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच कोणत्याही हॉटेलमध्ये थांबण्यासाठी 10 हजार रुपयांचं गिफ्ट वाऊचरही कंपनीकडून देण्यात येणार आहे.