सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 26 मे 2022 (13:37 IST)

गोड बातमी; आता साखर होणार स्वस्त, केंद्र सरकारचा निर्णय

sugar
वाढत्या महागाईत केंद्र सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतला असून आता 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जाणार आहे. यामुळे खाद्यतेलानंतर आता साखरही स्वस्त होणार आहे. देशात यंदा साखरेचे विक्रमी उत्पादन झालं असून देशांतर्गत साखरेचे दर वाढत होते. मात्र आता वाढत्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे साखर स्वस्त होणार आहे. मात्र साखर कारखान्यांचं अर्थकारण बिघडण्याचीही शक्यता आहे. 
 
महागाई नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या दहा दिवसात एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेतले जात आहेत. ज्यात गव्हाच्या निर्यातीवर बंदी आणि पेट्रोलच्या किमती कमी करण्यासाठी उत्पादन शुल्कात कपात यासारख्या मोठ्या घोषणांचा समावेश केला गेला आहे. आता मोदी सरकारनं आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून 1 जूनपासून साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली जात आहे.
 
मोदी सरकारनं यंदा साखरेच्या निर्यातीचं प्रमाण निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता 2021-22 साखर हंगामात निर्यातदार 100 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त साखर निर्यात करू शकणार नाहीत.