गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (15:33 IST)

टाटा मोटर्सचा ‘तो’मेसेज शेअर करणे पडेल महागात

राज्यात अनेकांच्या सोशल मीडियावर टाटा मोटर्स चा १५० वर्धापन दिन असून ही लिंक इतर गृप वर शेयर केल्या तुम्हाला एक जबरदस्त भेट वस्तू मिळणार असून तुम्ही टाटा मोटर्सतर्फे एक कार सुद्धा जिंकू शकता असे मेसेज फिरत आहेत. फसवणूक करणारे अशा प्रकारच्या खोट्या वेबसाईट किंवा लिंकद्वारे नागरिकांची फसवणूक करू शकतात. त्यामुळे ते टाळावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
 
टाटा मोटर्सच्या नावे फिरणाऱ्या या मेसेज नंतर आम्ही ५० जणांची निवड केली आहे. या सर्वांना बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. यात ५० लकी विजेते ठरणार आहेत. हा सर्वे आमची गुणवत्ता तपासण्यासाठी केला जात आहे. तसेच यात १०० टक्के बक्षीस देण्यात येणार आहे. तुम्हाला केवळ ४ मिनिट २४ सेकंदात या सर्वेतील प्रश्नाची उत्तर द्यायची असून बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्वरा करा, बक्षिसांची संख्या ही मर्यादीत आहेत, असे नमूद आहे. या मेसेजवर क्लिक करू नका अथवा त्या प्रश्नांची उत्तरे देत बसू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
 
अशा बनावट वेबसाईटपासून सतर्क राहण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच एसएमएस, ईमेल किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. फ्रॉड करणारे अशा प्रकारच्या खोट्या वेबसाईट किंवा लिंकद्वारे युजर्ससह फसवणूक करण्याचा प्रयत्न करू शकतात. असा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. मेसेजमध्ये जी लिंक दिली आहे. ती ओपन करू नका. या लिंकला क्लिक केल्यास तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या लिंकविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. जर आर्थिक फसवणूक झालीच तर वेळ न घालवता त्वरित जवळच्या पोलीस स्टेशन सोबत संपर्क साधावा.