बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (13:38 IST)

चक्क बाईकने नांगरणी बघा व्हिडिओ

आपल्या देशात शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा समजला गेला आहे. शेतकरी दिवस- रात्र शेतात मेहनत करुन शेताची राखण करतो आणि चांगल्या पिकासाठी राबत असतो. शेतकर्‍याचं एकचं ध्येय असतं ते म्हणजे चांगलं पीक. पिकासाठी नवनवीन कल्पना शेतकरी राबवत असतो. अशातच एका शेतकऱ्याची भन्नाट कल्पना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत तरुण शेतकरी चक्क बाईक चालवत शेत नांगरताना दिसत आहे. या शेतकर्‍याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. बैल आणि ट्रॅक्टरशिवाय शेत नांगरण्याची ही पद्धत बघून त्याचं कौतुक होत आहे. हा व्हिडीओ काही क्षणातच जोरदार व्हायरल झालेला पहायला मिळाला.
 
या बघितल्यावर कळेल की तरुणाने आपल्या बाईकच्या मागे छोटा नांगर जोडला आहे. अशात वेळ आणि मेहनत वाचवत तो अगदी सहजरित्या शेत नांगरत आहे. तरुणाचा हा देसी जुगाड पाहून नेटकरीही कौतुक करत आहे.
 
दरम्यान, jugaadu_life_hacks इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला असून यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहे.