शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (11:28 IST)

मोठी बातमी - दोन दिवसात सोने 500 रुपयांपेक्षा अधिक स्वस्त झाले, जाणून घ्या 10 ग्रॅमची नवीन किंमत

सोन- चांदीची किंमत: सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,141 रुपयांवर आली आहे. तर या काळात चांदीच्या किंमतीत किंचित वाढ झाली आहे. एक किलो चांदीची किंमत वाढून 59,429 रुपये झाली आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत सोन्याची किंमत 43000 रुपये प्रति दहा ग्रॅमपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. कारण मागणीत सतत घट कायम आहे. तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कोणतीही सकारात्मक बातमी नाही.
 
दिल्लीच्या सराफा बाजारात 99.9 टक्के सोने 365 रुपयांनी स्वस्त झाले आहे. शुक्रवारी किमती 45,506 रुपयांवरून घसरून 45,141 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​आल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,754 डॉलर प्रति औंस आहे.
 
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याची किंमत उच्चांकावर पोहोचली होती. ऑगस्ट 2020 मध्ये सोनं 56,200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता.सध्या सोनं 45,141 रुपयांवर आले आहे म्हणजे गेल्या 1 वर्षात सोने 11,000 रुपयांपेक्षा अधिक स्वस्त झाले आहे.
 
चांदीची किंमत :चांदीच्या किमतीत किरकोळ वाढ झाली आहे. दिल्ली सराफा बाजारात चांदी 21 रुपयांपर्यंत महाग झाली आहे.चांदीची नवीन किंमत आता 59,429 रुपये प्रति किलो आहे. एक दिवस आधी ते 59,408 रुपये प्रति किलोग्राम होती. आंतरराष्ट्रीय  बाजारात किंमत 22.68 डॉलर प्रति औंस आहे.