शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 27 जानेवारी 2022 (15:11 IST)

मुंबई बाजारात हंगामातला पहिला आंबा दाखल

यंदाच्‍या हंगामात रायगड जिल्‍हयातून मुंबई बाजारात पहिला आंबा पाठवण्‍याचा मान अलिबाग तालुक्‍याला मिळाला आहे. अलिबाग तालुक्‍यातील नारंगी येथील बागायतदार एस. के. मँगोजचे मालक वरुण संजयकुमार पाटील यांनी प्रजासत्‍ताक दिनी प्रत्‍येकी दोन डझनाच्‍या पाच पेटयांची काढणी करुन आंबा मुंबई बाजारात पाठवला आहे.
 
सातत्‍याने बदलत्‍या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसतो आहे. अवेळी पडणारा पाऊस , खराब हवामान ,पिकांवर येणारे आजार अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन वरूण पाटील यांनी यशस्‍वीरित्‍या आंब्‍याची काढणी केली. हा आंबा त्‍यांना मुंबई कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीच्‍या वाशी बाजारात पाठवला आहे. जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्‍वला बाणखेले यांनी वरुण यांचे अभिनंदन करत त्‍यांना पुढील हंगामासाठी शुभेच्‍छा दिल्‍यात.