शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

सार्वजनिक बँका सकाळी 9 वाजता उघडणार

निवासी विभागातील सार्वजनिक बँकांना सकाळी 9 वाजता शटर उघडण्याचे आदेश राज्यस्तरीय बँकर समितीने दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांपाठोपाठ राज्यातील सार्वजनिक बँकमधील व्यवहारही 1 नोव्हेंबरपासून जास्त वेळ सुरू राहणार आहेत. 
 
याआधी राष्ट्रीयकृत बँकांचे व्यवहार अधिक वेळ सुरू ठेवण्याचे आदेश इंडियन बँक असोसिएशनने (आयबीए) दिले होते. त्यापाठोपाठ राज्यस्तरीय बँकर समितीने सार्वजनिक क्षेत्रातील सहयोगी बँकांना आरबीआयच्या या आदेशांचे पालन करण्यास सांगितले आहे. त्यानुसार, निवासी वसाहतींमध्ये असलेल्या सार्वजनिक बँकांचे व्यवहार सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत होतील. यामध्ये ग्राहकांना सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत व्यवहार करता येतील. तर पुढील एक तास बँक अंतर्गत व्यवहारासाठी खुली असेल.
 
त्याचप्रमाणे व्यवसायिक क्षेत्रांमधील सार्वजनिक बँक सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत खुली ठेवण्यात येणार असून ग्राहकांना सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत व्यवहार करता येणार आहेत. याशिवाय इतर क्षेत्रांमध्ये मोडणार्‍या बँक आणि बँक कार्यालयांमधील व्यवहार सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू असतील. तसेच ग्राहकांना या ठिकाणी सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान व्यवहार करता येणार आहेत.