रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

पीएमसी महाघोटाळ्याचा दुसरा बळी

पीएमसी महाघोटाळ्याचा दुसरा बळी गेला आहे. मुलुंड येथील रहिवासी फत्तेमल पंजाबी (वय ५९) यांचेहृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते पीएमसी बँकेचे खातेदार आहेत. पंजाबी यांचे मुलुंडमध्ये हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकल स्टोअर आहे.  
 
यापूर्वी पीएमसी बँकेतील महाघोटाळ्यात मुंबईतील ओशीवारा येथील रहिवासी संजय गुलाटी यांचा मृत्यू झाला आहे. गुलाटी आंदोलनात सहभाग घेऊन घरी परतले, पण काही वेळातच त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. संजय यांना मुलावर उपचार करण्यासाठी पैशांची गरज असल्याची माहिती समोर आली. संजय गुलाटी यांनी संध्याकाळी घरी आल्यानंतर पत्नीला जेवण वाढण्यास सांगितले. जेवत असतानाच त्यांचे ह्रदय बंद पडून मृत्यू झाला. त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले, पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती.